आ. आबिटकर यांच्या हस्ते नाधवडेत ठाकरे सभागृहाचे लोकार्पण
कूर : (व्हिजन प्रतिनिधी)
नाधवडे ( ता.भुदरगड) येथे आमदार फंडातून उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहाचा लोकार्पण सोहळा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाधवडेला विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिल्याबद्दल आमदार आबिटकर यांचा सरपंच शितल पाटील व उपसरपंच के. टी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहाला सहा लाखांचा निधी दिल्याबद्दल शिवसेना शाखा नाधवडे यांच्यावतीने आबिटकर यांचा गौरव करित यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी भुदरगडचे माजी उपसभापती अजित देसाई, सरपंच शितल पाटील,बसरेवाडीचे माजी सरपंच संदीप पाटील, डे. सरपंच कृष्णात पाटील, पोलीस पाटील लता देसाई , जयवंत वायदंडे, अमर पाटील, शाखाप्रमुख शरद वैराट , तानाजी पाटील, अर्जुन पाटील , विशाल वायदंडे पांडुरंग पाटील , सागर पाटील, सोनबा देसाई, प्रकाश सुतार, शामराव पाटील, पांडुरंग पाटील, संदीप देसाई, अमित कामत, सुनील पाटील, कृष्णात पाटील, रंगराव पाटील, मनोहर परीट, संतोष पाटील, जीवन पाटील, नेताजी वायदंडे, दिलीप पाटील, जयसिंग गुरव, मारुती सोनगेकर, बंडोपंत कांबळे, मनोहर पाटील तसेच ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते. –