खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करूया !
– पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन
– आलाबादसह अर्जुनवाडा, नंद्याळ, तमनाकवाडा येथील सभांना जोरदार प्रतिसाद
बिद्री / सेनापती कापशी
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
आजपर्यंत जनतेने मला संधी दिली म्हणून माझ्या हातून ७५० देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचे भाग्य मिळाले. कामगार खात्याच्या माध्यमातून मतदारसंघात बांधकाम कामगारांच्या मुलांना ४८ कोटी रुपये शिष्यवृत्ती मिळाली. अशा विकासकामाच्या जोरावर गोरगरीबांची सेवा करण्याची संधी मिळाली. परंतु; मला तुरुंगात टाकून आणि कुटुंबीयांना छळून स्वतः आमदार होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खलनायकी प्रवृत्तीला हद्दपार करूया, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
चिकोत्रा खोऱ्यातील आलाबादसह, अर्जुनवाडा, नंद्याळ, तमनाकवाडा येथील प्रचारदौऱ्यात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा, नागणवाडी, आंबेओहळ प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यामुळे पाण्यावाचून वंचित असणाऱ्या गावांना कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली. चिकोत्रा खोऱ्यात हिरवाई आणल्याचे मला समाधान वाटत आहे. येथून पुढेही जनतेची सेवा करण्याची मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, संजयबाबा घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी संघर्ष केला. पण त्यामध्ये व्यक्तीगत कटुता अजिबात नव्हती. मात्र समरजित घाटगे यांनी ईडीचा ससेमिरा लावला. घरातील महिलांना त्रास देऊन आमदार होण्याच्या या राक्षसी महत्वाकांक्षी प्रवृत्तीला रोखले पाहिजे.
मधुकर करडे म्हणाले, समरजित घाटगे अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांची अडचण कधीच समजून घेतली नाही. ऊस तोडीत फार मोठा दुजाभाव केला जातो. गावातल्या माणसाला घेऊन गेल्याशिवाय काम होत नाही…
– – – – – –
दातृत्व असावे तर मुश्रीफसाहेबांसारखे…!
अर्जुनवाडाचे माजी सरपंच प्रदीप पाटील म्हणाले, अर्जुनवाडा गावातील मुले राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी जात होती. त्यावेळी आर्थिक अडचण आली. तेव्हा खेळाडूंना खेळाचे साहित्य व प्रवास खर्चासाठी ४५ हजार रुपये दिले. त्यावेळी आमचे उर भरून आले. म्हणूनच मुश्रीफसाहेबांच्यासारखे दातृत्व मी तरी पाहिले नाही.
– – – – – –