अध्ययन अनुभव देणारे उपक्रम अध्यापनात अंमलात आणा : मुख्याध्यापक कारंजकर
– विद्या मंदिर देवाळे येथे तिसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
बिद्री / कोल्हापूर
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शासनाचे तसेच आपण स्वतःहून विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पारंपारिक अध्यापनात बदल करून अध्ययन अनुभव देणारे उपक्रम व अध्यापन अंमलात आणा. असे प्रतिपादन मुख्याध्यापक सुनिल कारंजकर यांनी केले.
करवीर तालुक्यातील केंद्रशाळा वाशी केंद्रांतर्गत तिसरी शिक्षण परिषद विद्यामंदिर देवाळे शाळेत पार पडली. त्यावेळी अध्यक्षपदावरून श्री कारंजकर बोलत होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिषदेचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख मनीषा सपाटे म्हणाल्या
स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी जादा तास घेऊन ,प्रश्नपत्रिकांचा सातत्याने सराव केल्यास यश हमखास मिळू शकते.
शिक्षण परिषदनिमित्त इयत्ता पहिली केटीएस, इयत्ता २ री केटीएस गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार केंद्रप्रमुख सपाटे यांच्या हस्ते करण्यात आला. स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेबद्दल मुख्याध्यापक सुनिल कारंजकर व अलका कारंजकर यांचा, उत्कृष्ट व्हिडिओ निर्मिती केल्याबद्दल सुमन भोसले, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागस्तरावर शेळकेवाडीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल आल्याबद्दल बाजीराव कांबळे यांचा सत्कार केंद्र प्रमुख मनिषा सपाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर आदर्श कामकाजाबद्दल केंद्रप्रमुख मनिषा सपाटे यांचा सत्कार पार पडला.
‘वीर गाथा , पोक्सो कायदा ‘ या विषयावर नितीन गुरव यांनी, पॅट व विज्ञान प्रदर्शन या विषयावर कृष्णात सुतार यांनी विद्यांजली ॲप, नास या विषयावर स्नेहा माळी यांनी मार्गदर्शन केले. यु डायस बाबतचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख मनीषा सपाटे यांनी केले.
यावेळी पद्मा काळूगडे, उत्तम पाटील,अलका कारंजकर, अस्मिता देशमुख , सुनिता गुजर, कृष्णात भोपळे , अशोक पाटील, शारदा शिंदे, विमल पोवार, प्रमिला माने, तानाजी शेंडगे, गोरखनाथ पाटील, राहुल चौगले आदी मुख्याध्यापक, अध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिताबाली जाधव यांनी केले. प्रास्ताविक स्वागत मुख्याध्यापिका मीना वळवी यांनी तर आभार सुमन पाटील यांनी मानले.
— — –