कारच्या धडकेत बोरवडे येथील एक जण ठार
बिद्री :
टी.एम.सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
बिद्री कारखाना ते मुदाळतिट्टा राज्यमार्गावर भरधाव जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने बाबासो नामदेव कांबळे (वय ५२, रा. बोरवडे, ता. कागल) हा पादचारी ठार झाला.
बाबासो कांबळे हे सेंट्रिंग कामगार म्हणून काम करीत होते. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघाताची नोंद नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे. भिकाजी साताप्पा कांबळे यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी सायंकाळी काम आटोपल्यानंतर ते मुदाळतिट्टा येथे निघाले होते. हॉटेल मिनर्वासमोर आल्यावर पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की ते वीस फूट फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळेच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक दिगंबर अशोक सूर्यवंशी (रा. गंगापूर, ता. भुदरगड) याने पलायन करण्याच प्रयत्न केला; परंतु नागरिकांनी त्याचा पाठलाग करून मुदाळतिट्टा येथे पकडण्यात आले. त्याला मुरगूड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास मुरगूडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन पाखरे करीत आहेत.
– —