बाचणी येथे शनिवारी विजया हॉस्पिटलच्यावतीने लहान मुलांसाठी मोफत तपासणी शिबीर
– तपासणीबरोबर हेल्थ कार्डाचे वितरण
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
कागल तालुक्यातील बाचणी येथे कै. रामचंद्र केशव देसाई यांच्या स्मरणार्थ विजया हॉस्पिटल कागल शाखा बाचणीच्यावतीने लहान मुलांसाठी मोफत तपासणी व हेल्थ कार्डाचे वितरण शिबिर शनिवार १९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात आहे. अशी माहिती विजया चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉ. शितल देसाई यांनी दिली.
डॉ. देसाई म्हणाले, ज्या लहान मुलांना टायफाईड, निमोनिया, डेंगू झालेला आहे व रोग प्रतिरोधक शक्ती कमी आहे, शौचसाठी वेळ लागतो, वयानुसार वजन कमी किंवा जास्त आहे, सतत बेकरीचे पदार्थ खातात त्यामुळे भुख लागत नाही व वरचेवर आजारी पडतात. अशा सर्व रोगांबाबत उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वार्षिक सल्ला मसलतसाठी केवळ ८० रुपयांमध्ये हेल्थ कार्डचे सहभागी मुलांना वितरण करण्यात येणार आहे.
शिबिरात लाभ घेवू इच्छीणाऱ्या पालकांनी शिबिरापूर्वी किंवा शिबिरा दिवशी सकाळी विजया चिल्ड्रन हॉस्पिटल, राजे बँक शेजारी, खेबवडे रोड, बाचणी येथे नाव नोंदणी करावी. असे आवाहन डॉ. देसाई यांनी केले. अधिक माहितीसाठी मोबा. 9980132015 किंवा 9209462859 या नंबरवर संपर्क साधावा.
— — –