नंद्याळ येथे 01 कोटी 25 लाख 25 हजाराचे विविध विकास कामांचा प्रारंभ व लोकार्पण सोहळा
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून नंद्याळ, ता. कागल येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व शुभारंभ गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करणत
या आले. वेळी मराठी शाळा संरक्षक भिंत 20 लाख, मराठी शाळेसमोर सोलर हायमास्ट 3 लाख, मराठी शाळा दुरुस्ती 9 लाख या सर्व कामाचे लोकार्पण सोहळा मराठी शाळा खोली बांधकाम 10 लाख, अंगणवाडी क्र. 173 इमारत बांधकाम 11 लाख 25 हजार, स्मशान भूमी रस्ता 15 लाख, विठ्ठल मंदिर दुरुस्ती 10 लाख, वाचनालय इमारत 5 लाख, दलीत वस्ती रस्ता 4 लाख, शाळा दुरुस्ती 5 लाख, तलाठी ऑफिस इमारत बांधकाम 15 लाख, सोलर हायमास्ट 3 लाख व अशामी रस्ता 15 लाख अशा विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा युवा नेते नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी शशिकांत खोत, आण्णासो आडेकर, सरपंच मनीषा कांबळे, उपसरपंच लक्ष्मी कोराणे, राजेंद्र येजरे, बाबुराव अस्वले, आर. डी. पाटील, करडे सर, प्रदीप करडे, दिलीप पाटील, गौसलाल देसाई, हरुण देसाई, सागर पाटील, मधुकर पाटील, मेहजदीन देसाई, बाळू कांबळे, भिकाजी कोराणे, संजय शिंदे, प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.