प्रकाश कांबळे-साकेकर यांना डिगे फाऊंडेशनचा समाजभूषण पुरस्कार प्रदान
कोल्हापूर :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा संघटना, कोल्हापूर यांच्यावतीने शासकीय मुद्रणालयाचे प्र. सहाय्यक व्यवस्थापक प्रकाश धर्मा कांबळे-साकेकर यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कोल्हापूरच्या शाहू सभागृहात हा शानदार कार्यक्रम पार पडला. अध्यस्थानी माजी खासदार एस. के. तिने मेमोरियल फाऊंडेशनचे निमंत्रक सदानंद शंकरराव डिगे होते.
समाजाच्या सर्वांविण विकासासाठी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारी माणसे डॉ. आबेडकर विचारांची संपत्ती आहे. आपला प्रवास आणि त्या प्रवासातून समाजाप्रती व्यक्त झालेल्या उत्तरदायित्वाच्या भावनांची दखल घेत प्रकाश कांबळे-साकेकर हा पुरस्कार जाहिर झाला होता. श्री कांबळे यांच्याबरोबर सुमारे ३० व्यक्तिंचा विविध पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार शाहू महाराज म्हणाले, खासदार एस. के. तिने मेमोरियल फाऊंडेशने सामाजिक जाणिव ठेवत समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत आहे. यामुळे त्यांच्या कार्याबद्दल पाठीवर थाप व पुढील कार्यास प्रोत्साहन मिळत आहे. फाउंडेशनच्या चांगल्या कामासाठी मी सदैव पाठिशी राहीन अशी ग्वाही दिली.
यावेळी गोखले कॉलेजच्या प्रा. डॉ. स्मिता गिरी, ॲड . विद्यालक्ष्मी राजहंस यांची भाषणे झाली. कार्यक्रमास सनी गोंधळी, राजन कदम, अशोक भास्कर, महादेव कांबळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन तेजस्विनी पांचाळ यांनी केले. प्रास्ताविक व आभार डॉ. धोंडीराम कांबळे यांनी मानले.
— — —