चंद्रेच्या मधुरा पाटील बनल्या भोईटे विद्यालयाच्या स्कूल मिनिस्टर
– कसबा वाळवे येथील भोईटे विद्यालयाच्यावतीने खेळ पैठणीचा ; माता पालक स्कूल मिनीस्टर
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज )
कसबा वाळवे (ता. राधानगरी ) येथील आमदार श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा विद्यालयाची माता पालक स्कूल मिनिस्टर बनण्याचा या अनोख्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत चंद्रे येथील सौ मधुरा मधुकर पाटील यांनी रोमहर्षक कौशल्य दाखवत मानाच्या पैठणीवर आपले नाव कोरले. कोल्हापुरी फेटा, गौरवचिन्ह, गौरव पत्र व मानाची पैठणी देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. या अनोख्या स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या १०० हून अधिक माता पालकांनी सहभाग घेतला होता.
बारडवाडी (ता.राधानगरी) येथील सौ. सारिका पांडुरंग सुतार यांनी दुसरा क्रमांक पटकावत प्रेशर कुकर जिंकला. तिसऱ्या क्रमांकाच्या मानकरी सौ. मनिषा उत्तम पाटील (कसबा वाळवे ) यांनी तांब्याचा जार व ग्लास हे बक्षीस जिंकले. सौ. अश्विनी महादेव बारड (बारडवाडी) यांनी चतुर्थ क्रमांकाची सिंगल गॅस शेगडी जिंकली तर पाचवा क्रमांक सौ. पुनम विनोद पाटील (बिद्री) यांनी पटकावत हॉट पॉट हे बक्षीस मिळविले.
अंतिम फेरीतील २५ स्पर्धक महिलांना भेटवस्तू व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या स्पर्धक महिलांना बक्षिसाबरोबरच मानाचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले .कार्यक्रमाचे प्रायोजक मुधाळे ज्वेलर्सच्या श्रीमती सुनीता बाबुराव मुधाळे व कोरे हार्डवेअर्सच्या सौ. स्मिता राहुल कोरे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष अशोकराव फराकटे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालिका सौ. तेजस्विनी घाटगे, सरपंच श्रीमती वनिता पाटील, ग्रा. प. सदस्या सौ. छाया संकपाळ, सौ. सलोनी संकपाळ, कु. निर्मला भांदिगरे, सौ. सुवर्णा पाटील, प्रा. सौ. रुपाली इंगळे, चांदेकरवाडी सरपंच सौ. सीमा खोत आदींबरोबरच माता पालक संघाच्या पदाधिकारी व सदस्या,माता-पालक, शिक्षक -शिक्षकेतर उपस्थित होते.
स्वागत सौ. सुमित्रा उमेशराव भोईटे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश संकपाळ यांनी केले. रामचंद्र चौगले व विश्वास आरडे यांच्या सुत्रसंचालनाने स्कूल मिनिस्टर कार्यक्रमाला रंगत आली. बाजीराव सुतार यांनी आभार मानले.
( व्हिजन प्रतिनिधी : बाजीराव सुतार)
— — –