साके सरपंचपदी सौ. अंजली कांबळे यांची बिनविरोध निवड
बाचणी : (व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी)
साके (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पालकमंत्री हसन मुश्रीफ गटाच्या सौ. अंजली चंद्रकांत कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णयअधिकारी प्रदीप कोरवी होते.
निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या सरपंच सौ.सुशिला दगडू पोवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सरपंचपदी सौ. अंजली चंद्रकांत कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्य़ात आली. उपसरपंच सौ. रंजना बाळासाहेब तुरंबे, मावळत्या सरपंच सौ.सुशिला पोवार यांचे हस्ते नुतन सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक पाटील, बाजार समितीचे संचालक नानासो कांबळे, मारूती निऊंगरे, .किरण पाटील, रंगराव चौगले, राजू शेंडे, अशोक सातुसे, सी.बी.कांबळे, मोहन गिरी, सदस्य, .रविंद्र जाधव, .निलेश निऊंगरे, सुजय घराळ, युवराज पाटील, सौ.आक्काताई चौगले, सौ.संपदा पाटील, सौ.अंजना गिरी, सौ. प्रभावती जाधव, तेजस्विनी पाटील, मारुती पाटील, सुरेश आगळे,माजी सैनिक,ग्रामस्त उपस्थीत होते. आभार ग्रामसेवक संजय पाटील यांनी मानले.
— — –