प्रकाश कांबळे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहिर
– १३ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण
कोल्हापूर : ( व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी )
माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशन व कोल्हापूर जिल्हा संघटना, कोल्हापूर यांच्यावतीने शासकीय मुद्रणालयाचे प्र. सहाय्यक व्यवस्थापक प्रकाश धर्मा कांबळे-साकेकर यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहिर झाला आहे.
समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारी माणसे डॉ. बाबासाहेब आबेडकर विचारांची संपत्ती आहे. आपला प्रवास आणि त्या प्रवासातून समाजाप्रती व्यक्त झालेल्या उत्तरदायित्वाच्या भावनांची आम्ही दखल घेऊन सन २०२४-२५ सालातील राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनदिनी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती माजी खासदार एस. के. तिने मेमोरियल फाऊंडेशनचे निमंत्रक सदानंद शंकरराव डिगे यांनी दिली.
— — —