मुदाळच्या उपसरपंचपदी गंगाराम पाटील
बिद्री : (व्हिजन प्रतिनिधी)
मुदाळ (ता. भुदरगड) च्या उपसरपंचपदी गंगाराम मधुकर पाटील यांची निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजनंदिनी विकास पाटील होत्या.
निवडीनंतर उपसरपंच पाटील यांचा सरपंच पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सदस्य महेश पाटील, रघुनाथ पाटील, कृष्णात पाटील, तेजस्विनी पाटील, शोभा पाटील, शीतल पाटील, संगीता पाटील, सुनीता पाटील, सारिका पाटील, रेश्मा केसरकर उपस्थित होते. ग्रामसेवक अशोक जाधव यांनी स्वागत केले.
…………