गोकूळच्या बोरवडे शीतकरण केंद्रात दहीहंडी उत्सव साजरा
बिद्री : ( प्रतिनिधी)
गोकुळ दूध संघाच्या बोरवडे ( ता. कागल ) येथील शीतकरण केंद्रात श्री कृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जन्माष्टमी दिवशी दुपारी भगवान श्रीकृष्ण यांच्या फोटोचे पूजन संघातील ज्येष्ठ कर्मचारी राजेंद्र पाटील ( बिद्री ) यांच्या हस्ते करण्यात आले. तर रात्री घोटवडे येथील महिला मंडळाचे भजन व बारा वाजता जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.
गोपाळकाला दिवशी केंद्राच्या आवारात बांधलेली दहीहंडी कुंभारवाडा येथील बाल गोविंदा पथकाने फोडली. त्यांना सेवानिवृत्त कर्मचारी पंडीत पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या वेळी शाखाप्रमुख विजय कदम, लॅबप्रमुख शेखर पाटील, संकलन अधिकारी आशिष पाटील, एकनाथ फराकटे, उत्तम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश लगट, युवराज भोसले, बाळू मंडलिक तसेच विविध विभागाचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
— —