आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कुरुकली येथील दलित वस्तीतील पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटप
बिद्री : (व्हिजन प्रतिनिधी)
कुरुकली (ता. कागल) येथील दलित वस्तीत 2024 पुरामध्ये 15 कुटुंबांतील लोकांचे स्थलांतर झाले होते. पंधरा कुटुंबातील 56 पुरुष व महिला सदस्याला आ. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
स्वागत अमित कांबळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष विकासराव पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांनी 2019 व 2021 च्या महापुराच्या वेळी देखील पूरग्रस्तांसाठी या तालुक्यांमध्ये सातत्याने मदतीचा हात दिला होता. यावेळी देखील आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन ने ब्लँकेट च्या रूपाने मदतीचा हात पुढे केला आहे. कुरुकली माजी सरपंच बी. आर. पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास आप्पासाहेब बेलवलेकर , अरुण पाटील , सुनील कांबळे, वसंत पाटील , महेश पाटील, सुनील बेलवलेकर , गुलाब तिराळे, प्रकाश दाभोळे, बाळासो धोंडीराम पाटील, पोलीस पाटील सतीश तिराळे, विवेक कांबळे , विजय नेताजी पाटील, विनायक बंडा पाटील इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
— —