भाजपाच्या क्रीडा जिल्हाध्यक्षपदी अमरसिंह पाटील यांची निवड
बिद्री : ( प्रतिनिधी )
कोल्हापूर जिल्हा भाजपा क्रीडा अध्यक्षपदी बिद्री कारखान्याचे कामगार नेते पैलवान अमरसिंह कुंडलिक पाटील ( गंगापूर ) यांची निवड झाली. भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहूल देसाई यांनी पाटील यांना निवडीचे पत्र पाठवले आहे.
या निवडीबद्दल बोलताना अमरसिंह पाटील म्हणाले, पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी संपूर्णपणे निष्ठेने पार पाडणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असून अधिकाधिक लोकांना पक्षाशी जोडण्याचे काम करेन. पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागात खेळाच्या चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी कटिबद्ध आहे.
या निवडीसाठी खासदार धनंजय महाडिक, शाहू समुहाचे प्रमुख समरजित घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, धनाजीराव मोरस्कर, प्रविणसिंह सावंत, नाथाजी पाटील, देवराज बारदेस्कर, सरदार सांवत, युवराज पाटील, दिगंबर देसाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींचे सहकार्य लाभले.
फोटो : अमरसिंह पाटील