बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाई विरोधात कारखाना व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर मंगळवारी (दि. १६) सुनावणी होणार होती. ही पुढे ढकलण्यात येवून ती २३ जुलैला होणार आहे.