वृक्षारोपणा बरोबरच निसर्गाचे संवर्धनही महत्वाचे. कागलचे तहसिलदार अमरदिप वाकडे यांचे प्रतिपादन
– केनवडे येथील अन्नपूर्णा कारखान्यावर वृक्षारोपण
केनवडे : प्रतिनिधी
वातावरणात जे बदल होत आहेत ते बेसुमार वृक्षतोडीमुळेच होत असून निर्सगाचा समतोलही यामुळे बिघडायला लागला आहे. जंगलाची संख्या कमी झाल्याने यंदा प्रचंड उष्मांक जाणवला आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करून प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन ही करावे. असे प्रतिपादन कागलचे तहसीलदार अमरदिप वाकडे यांनी केले.
अध्यक्षस्थानी अन्नपुर्णाचे चेअरमन व माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
केनवडे ता. कागल कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कारखाना कार्यस्थळावर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो जंगली वृक्षांचे रोपण करून मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालण्यात आले.
यावेळी अन्नपुर्णाचे संचालक शिवसिंह घाटगे, दिनकर पाटील, विश्वास दिंडोर्ले, ‘के. के. पाटील, राजू भराडे, एम. बी.पाटील, सरपंच अनुराधा शिंदे, उपसरपंच शुभांगी पाटील, सरपंच सुनिता पाटील, यांच्यासह मान्यवर
व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
— –
Related Stories
July 13, 2024