बोरवडेत ग्रामपंचायतीच्यावतीने गावतलाव परिसरात वृक्षारोपण
बोरवडे : प्रतिनिधी
बोरवडे (ता. कागल) येथील ग्रामपंचायत व बालाजी फराकटे युवा मंचच्यावतीने गावतलाव सुशोभिकरणार्तंगत वृक्षारोपण करण्यात आले.
गावतळे परिसरात सरपंच जयश्री केदार फराकटे व सदस्या जयश्री बालाजी फराकटे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. सरपंच जयश्री म्हणाल्या, सध्या २०० रोपांची लागवड केली. येत्या काही दिवसांत अजून ३०० रोपांची लागवड तलाव परिसरात केली जाणार आहे
यावेळी माजी सदस्य बालाजी फराकटे, केदार फराकटे, प्रकाश साठे, संतोष फराकटे, पांडुरंग फराकटे, सागर बलुगडे, संदीप साठे, रमेश कांबळे, सचिन कुंभार, अनिल बल्लाळ, विलास कांबळे मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विशाल मगदूम यांनी केले. आभार कृष्णात केसरकर यांनी आभार मानले
– —