खेबवडे येथे क्रांती तरुण मंडळाच्या सिंहगड किल्ला प्रतिकृतीने पटकावला प्रथम क्रमांक
– खेबवडे येथील लोकराजा शिवविचार मंचच्यावतीने किल्ला प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन
खेबवडे : विवेक मिठारी
(व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी)
खेबवडे (ता. करवीर) येथील लोकराजा शिवविचार मंच यांच्यावतीने दरवर्षी गडकिल्ले स्पर्धाचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी सुद्धा या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्या.
क्रांती तरुण मंडळाने बनवलेल्या सिंहगड किल्ला प्रतिकृतीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. भगतसिंग तरुण मंडळाने बनवलेल्या प्रतापगड प्रतिकृतीने द्वितीय तर एनएच- 4 बॉईज या मंडळाने बनवलेल्या पन्हाळा प्रतिकृतीने तृतीय क्रमांक मिळवला. याच बरोबर असंख्य अप्रतिम कलाकृती बालमित्रांनी साकारल्या होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्यकर्तृत्व व प्रेरणा लहान वयापासून मुलांमध्ये रुजावी यासाठी अशा स्पर्धेचे नियोजन करण्यात येते. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या स्पर्धेचे परीक्षण व्ही. आर. सडोलकर व श्री कुंभार सर यांनी केले
या स्पर्धेसाठी महेश वडींगेकर, महाराष्ट्र पर्यावरण सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय चौगले, पैलवान स्पोर्ट्स चे सुमित चौगले, ज्योतिषभास्कर सुशांत स्वामी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी लोकराजा शिवाविचार मंचचे अध्यक्ष संतोष चौगले, सरदार चौगले, किरण चौगले, प्रतीक कोरे, प्रसाद चौगले, सूरज कोरे, रोहित पाटील, शुभम जोंधळे तसेच सहकारी उपस्थित होते.
– – — – –