मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेत प्रदीप वेसणेकर यांना श्रद्धांजली
मुरगूड : व्हिजन मराठी न्यूज (शशी दरेकर )
मुरगूड (ता . कागल) येथील श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक आणि मुरगूडमधील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रदीप दत्तात्रय वेसणेकर ( वय ६५ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले .
मुरगूडच्या व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यानां श्रध्दांजली वाहण्यात आली .
यावेळी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर म्हणाले श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर व्यापारी पेठेच्या गणेश तरुण मंडळात ते सक्रीय होते. त्यांच्या हसतमुख व आपलेपणाच्या स्वभावामुळे मोठा मित्रपरिवार त्यांच्याशी जोडला गेला होता. श्री गवाणकर आठवणी उजाळा करून देताच संचालक मंडळ व कर्मचारी गहिवरून आले.
यावेळी व्हा. चेअरमन प्रकाश सणगर, संचालक किशोर पोतदार , प्रशांत शहा , शशिकांत दरेकर , साताप्पा पाटील , हाजी धोंडिराम मकानदार , नामदेवराव पाटील , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका रोहिणी तांबट , सुनंदा जाधव , मॅनेंजर सुदर्शन हुंडेकरी तसेच कर्मचारी उपस्थित होते .
– – – – – – –