निधन वार्ता
डॉ. हिंदूराव पाटील यांच्या निधनाने साके गावावर शोककळा
बिद्री : व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी
साके (ता. कागल) येथील माजी उपसरपंच व पशुधन डॉक्टर हिंदुराव बापू पाटील यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. वारकरी सांप्रदायतील श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीवर शोककळा पसरली.
पशुसेवेचं अविरतपणे व्रत घेऊन ते मुक्या जनावरांना अलगद बरे करायचा त्यांचा हातखंडा होता. कामात नेहमी तत्पर होते. पशुधन सेवा करताना पैशाचा हिशोब करीत नसत. मुक्या प्राण्याला नवं संजीवनी मिळावी हाच ध्यास ठेवून आपली सेवा बजावित. ‘आबा’ या नावाने ते सर्वांना परिचित होते.
साके ते पंढरपूर माघ पायी वारी सुरू करून विठ्ठल भक्तीचा नवा पायंडा पाडला. देह-भान विसरुन सगळं नियोजन करीत असत. त्यांची दिंडीतील धावपळ सर्वांना प्रेरणादायी असायची. दोन्ही मुलांना नामवंत पैलवान करताना निर्व्यसनी राहणं, अन्यायाविरुद्ध नेहमीच सर्वांच्या पाठीशी असायचे. गावच्या अखंड सेवेचा हा ऐन एकादशीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबियावर आघात करणारी घटना आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
(शब्दांकन : विनायक सातुसे)
– – – – –