आण्णा-भाऊ उद्योग समुह आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खंबीरपणे पाठीशी : अशोकआण्णा चराटी
-आण्णा-भाऊ संस्था समुहाच्या पदाधिकारी मेळावा संपन्न
आजरा : व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी
राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी आजरा मतदारसंघात न भुतो न भविष्यतो असा निधी आणला असून आजरा शहराचा चेहरामोहरा बदलणारे ते एकमेव आमदार असून आण्णा-भाऊ उद्योग समुह आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन आण्णा भाऊ समुहाचे प्रमुख अशोकराव चराटी यांनी दिली.
आजरा येथे आण्णा-भाऊ संस्था समुहाचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते तर प्रमुख उपस्थित आमदार प्रकाश आबिटकर, आजरा बँकेचे चेअरमन रमेश कुरूणकर, आजरा सुतगिरणीचे व्हा.चेअरमन डॉ.अनिल देशपांडे होते. मेळाव्यास हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
चराटी म्हणाले की, आजरा शहराच्या विकासासाठी आ.आबीटकर यांनी १०० कोटीचा निधी दिला असून प्रत्येक गावागावात आबीटकर यांचा निधी पोहचला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी सर्वस्व अर्पण करणारे आ. आबीटकर हे राज्यातील एकमेव आमदार आहेत. आजरा शहर पाणी प्रश्नासाठी रात्री बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर नगरसेवकांची बैठक लावून पाणी प्रश्न मार्गस्थ लावला यावरून त्यांच्या कामाचा धडाका लक्षात येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील आमदार म्हणून ते परिचित आहेत. महायुती सरकारने सर्व सामान्येचा योजना राबवून विकासाची पहाट दाखविली. त्यामुळे सामान्य माणूस आ. आबीटकर यांच्यावर खुष आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महायुती शासनाने मागील अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्वसामान्य नागरीकांना केंद्रबिंदु मानून अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत. या निर्णयांचा फायदा अनेक नागरीकांना झालेला आहे. लाडक्या बहीण सारख्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले.
आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, या मतदारसंघाचे प्रश्न कसे सुटतील याचे स्वप्न पाहिले होतं. महायुती सरकारच्या माध्यमातून मतदार संघात सर्वांधिक निधी लावून प्रकल्प कार्यान्वित केले. सगळ्या कामांचे चांगल्या पध्दतीने मुल्यमापन करणारी आजरेकर मंडळी आहेत त्यांना कल्पना आहे कामांचे कोण आहेत व बिनकामाचे कोण आहेत. त्यामुळे त्यांचे मुल्यमापन करून आज-याची जनता आपल्या ला भर भरून आशिर्वाद देईल. अत्यंत चांगल्या पद्धतीने एका पेक्षा एक निर्णय महायुती शासनाने घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये, 75 वर्षाच्या जेष्टांना एसटी मोफत, मुलींच्या साठी मोफत शिक्षणाची सोय अशा प्रकारचे क्रांतिकारक निर्णय महायुतीच्या सरकारने राबविल्ये असुन ते कायमस्वरूपी रहाणार आहेत. प्रास्ताविक माजी नगरसेवक विलास नाईक यांनी केले.
यावेळी दिपक सातोस्कर, मारुती मोरे, विजय पाटील, आण्णा भडगे, आजरा कारखाना माजी संचालक दशरथ अमृते, जनता एज्युकेशन सोसायटीचे संचालक विजयकुमार पाटील, सुतगिरण संचालक अनिकेत चराटी, भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, सरचिटणीस अतिश देसाई, नगरसेवक अमित खेडेकर, इम्रान सोनेखान, किटवडे सरपचं लहू वाडकर, आनंदा कुंभार, झुलपेवाडी सरपंच नामदेव जाधव, गोविंद गुरव, सचिन पावले, लहू पाटील, जुबेर मानगांवकर, आनामुल्ला आगलावे, दिलावर चाँद यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– – – – – – – – – – – – –
राज्यात मतदार संघ अव्वल !
राधानगरी मतदारसंघात मोठा रचनात्मक विकास झाला असुन वीज, रस्ते, समाज मंदिरे असा वैविध्यपूर्ण माध्यमातून विकासाची नवी पहाट मतदारसंघात अवतरली असुन विकास कामांसाठी मतदार संघ राज्यात अव्वल असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
– – – – – – – – – – – – – – –