आकुर्डेच्या माळावर मिनिटेक्सस्टाइल पार्क व सुतगिरणी प्रकल्प उभारणार: आमदार प्रकाश आबिटकर
-आयुष्यभर गोर-गरीबांच्या जमिनी हडपणाऱ्यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवू नये
आजरा : व्हिजन मराठी न्यूज प्रतिनिधी
ज्यांनी गोरगरिबांच्या जमिनी लाटण्यामध्ये आयुष्य घालवले. देवस्थान जमिनी लाटल्या. मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लाटल्या. आपल्याच भावकीतल्या 16 पाटलांच्या जमिनी दादागिरी ने हडपल्या. हुतात्मा सूतगिरणीसाठी नोकरी लावतो लावतो म्हणून घेतलेल्या जमिनींचे अद्याप पैसे न दिलेल्यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नाही. आकुर्डे येथील भुतोबाच्या पठारावर दीडशे कोटी रुपयांचा टेक्स्टाईल पार्क व ऐंशी कोटींचा सुतगिरणी प्रकल्प उभा करणार तसेच आजरा एमआयडीसी विस्तारीकरणासाठी मंजुरी घेतली आहे. यामुळे रोजगार निर्मिती व औद्योगिक विकास चालला मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते येथील जनता सहकारी गृहतारण संस्था व मराठा महासंघ यांच्या वतीने केलेल्या आयोजीत केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे होते.
आमदार आबिटकर म्हणाले, राधानगरी मतदार संघ हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम व डोंगराळ आहे. येथील बहुतांशी क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित असल्यामुळे औद्योगिक प्रकल्प उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींची सोडवणूक करत राधानगरी तालुक्यासाठी कौलव येथील गायरान जमिनीमध्ये मिनी एमआयडीसी मंजूर केली होती त्याचे काम देखील सुरू करण्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली मात्र माजी आमदार के. पी. पाटील यांनी या प्रकल्पात देखील खो घातला. त्यामुळे राधानगरी वासियांचे एमआयडीसी चे स्वप्न अपूर्ण ठेवण्यास के. पी. पाटील हेच जबाबदार आहेत. त्यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात आकुर्डे एमआयडीसीतील शेतकऱ्यांना प्रति गुंठा साडेतीन हजार रुपये रक्कम देऊ न शकल्यामुळे हा प्रकल्प काळानुरूप रखडत गेला. परिणामी येथील शेतकऱ्यांनी आम्हाला एमआयडीसी प्रकल्प नको अशी मागणी लावून धरली त्यामुळे भुदरगड तालुक्याची एमआयडीसी देखील रखडण्याचे महापाप हे के.पी. पाटील यांचेच आहे. परंतु त्याच आकुर्डे येथील भूतोबाच्या माळावर या तालुक्याचे सुपुत्र असलेले राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे कोटी रुपयांचा मिनी टेक्स्टाईल पार्क व ऐंशी कोटी रुपयांची सुतिगिरणी उभारणी करून औद्योगिक विकासास चालना देणार आहे. यामुळे याच ठिकाणी शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. पुढील काळात राधानगरी वासियांचे एमआयडीसी चे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आजरा येथील एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने सरकारी हक्कातील एमआयडीसी साठी संपादित करण्यात आली असून त्याकरिता 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचेही काम आचारसंहिता झाल्यानंतर सुरू करण्यात येईल. पण के. पी. पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात औद्योगिक विकासासाठी कोणतीही ठोस कामगिरी केली नाही. उलट आम्ही मंजूर केलेली एमआयडीसी बंद करण्याचे काम केले हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता जाणून आहे. या अशा कपट-कारस्थानाने बरबटलेल्या व्यक्तीस जनता कायमचे हद्दपार करील.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, आजी-माजी सैनिक वेल्फेअर फाउंडेशनचे दत्तात्रय मोहिते, शेतकरी मंडळाचे संभाजीराव इंजल, उद्योजक विजयकुमार पाटील, नाथा देसाई, सुधीरभाऊ परळकर, प्रकाश देसाई, शंकरराव शिंदे आदींसह उद्योजक उपस्थित होते. प्रास्ताविक मारुती मोरे यांनी केले. आभार बंडोपंत चव्हाण यांनी मांनले
– – – – – – – – –
आज-याच्या उद्योजकांकडून आ. आबिटकर यांचे अभिनंदन……
आजरा एमआयडीसीचे विस्तारीकरण करावे अशी उद्योजकांची मागणी केली होती या मागणीची पूर्तता आ. आबिटकर यांनी केल्याबद्दल उद्योजकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
– – – – – – – – – – – –
चोराच्या उलट्या बोंबा….!
राधानगरी तालुक्याला मंजूर केलेली एमआयडीसी प्रकल्प के. पी. पाटील यांच्या कपटकारस्थानामुळे रद्द झाली. चोराच्या उलट्या बोंबा या उक्तीप्रमाणे प्रमाणे जावई व के. पी.पाटील यांची कथनी व करणी स्वाभिमानी राधानगरीवाशियविसरणार नाहीत.
– – – – – – – – – – – – –