बोरवडे येथे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी उत्साहात प्रचार प्रारंभ
– घरोघरी ‘विकासगंगा’ पुस्तिकेचे वाटप
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
व्हिजन मराठी न्यूज
बोरवडे (ता. कागल ) येथे महायुतीचे उमेदवार
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा निवडणूकीचा प्रचार प्रारंभ शुक्रवारी उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या पाच वर्षातील ७००० कोटीच्या विकास कामाचा आढावा घेणारा ‘ विकासगंगा ‘ पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी ग्रामदैवत श्री जोतिर्लिंग मंदिरात श्रीफळ अर्पण करण्यात आला. गावचा राखणकर्ता श्री म्हसोबा देवालयाचा आशीर्वाद घेवून प्रचारफेरीला सुरवात करण्यात आली. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक मनोज फराकटे यांच्या हस्ते उपस्थित नागरिकांना ‘विकासगंगा’ पुस्तिकेचा वाटप करण्यात आले.
यावेळी मनोज फराकटे म्हणाले, बोरवडे गावाने मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर अपार प्रेम करीत प्रत्येक निवडणूकीत मोठे मताधिक्य दिले आहे. त्याचबरोबर बोरवडे गावच्या विकासात श्री मुश्रीफ यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जनतेचे जसे प्रेम आहे तेच प्रेम आहे. त्यामुळे सहाव्यांदा विजयासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे कंबर कसून कामाला लागूया. या प्रचार यात्रेत माजी आमदार संजयबाबा घाटगे गट खासदार संजयदादा मंडलिक व मुश्रीफप्रेमी जनता एकत्र येत प्रचार प्रारंभ झाला आहे. निश्चितपणे यावेळी चांगले मताधिक्य मिळेल. असा विश्वास श्री फराकटे यांनी व्यक्त केला.
यावेळी घरोघरी जावून कार्यकर्त्यांनी विकासगंगा पुस्तिकेचे वाटप करून मंत्री हसन मुश्रीफ यांना विजय करावे. असे आवाहन केले. प्रचार फेरीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
– – – – – – – – –
तात्यांच्या माघारी… आमची जबाबदारी !
नामदार मुश्रीफ यांचे बोरवडे हे हक्काचे गाव आहे. बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष स्वर्गीय गणपतराव फराकटे ((तात्या) यांनी अनेक निवडणूकीत मुश्रीफसाहेबांना साथ देत बिद्री-बोरवडे परिसरातून चांगले मताधिक्य दिले होते. त्यांच्या अकाली जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नामदार मुश्रीफ यांना मताधिक्य देण्याची परंपरा राखली जाणार आहे. तात्यांच्या माघारी… आंम्हा कार्यकर्त्यांची जबाबदारी जपणार आहोत ! असे उपसरपंच विनोद वारके यांनी यावेळी सांगितले.
– – – – – – – – – – – –
यावेळी प्रचार सभेत मनोज फराकटे, पंचायत समितीचे माजी सदस्य रघुनाथ कुंभार, अन्नपूर्णा शुगरचे संचालक आनंदराव साठे, ज्ञानदेव फराकटे, कृष्णात फराकटे, तानाजी साठे, तानाजी जमनिक, एकनाथ चव्हाण, विनोद वारके, जोतीराम साठे, अशोक कांबळे, तुकाराम कांबळे, दतात्रय चांदेकर, भागवत वारके, पांडूरंग खाडे, राजेंद्र जाधव, सुनील मगदूम, साताप्पा साठे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– – – – – – –