हसन मुश्रीफसाहेबांना पाठचा भाऊ समजून पाठबळ द्या
– बाचणी येथे हळदी-कुंकू कार्यक्रमात सौ. सायरा मुश्रीफ यांचे भावनिक आवाहन
बिद्री, बोरवडेसह केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बु ॥ वाळवे खुर्द येथे महिलांचा स्नेह मेळावा संपन्न
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
ज्यांचा कामाचा दिवस सकाळी साडेपाच पासून सुरु होत घरी येणार्या प्रत्येकाची विचारपूस करणारे, दिन दलितांना आधार देणारे, गोर-गरिबांचे कैवारी, अडअडचणीला धावून जात जनतेचा श्रावण बाळ म्हणून ज्यांची ओळख आहे. असे हसन मुश्रीफसाहेबांना पाठचा भाऊ समजून पाठबळ द्या. मताधिक्याने असे भावनिक आवाहन सौ. सायरा हसन मुश्रीफ यांनी केले.
बाचणी (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ झालेल्या महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण सहकारी दूध संस्थेच्या अध्यक्षा सौ. गंगूबाई पाटील होत्या.
सौ. शितल फराकटे म्हणाल्या, मुश्रीफसाहेबांनी अहोरात्र कष्ट घेत कागल-गडहिंग्लज-उत्तूर मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. ग्रामिण भागातील रस्ते, पाण्याची, आरोग्याची सुविधा निर्माण करीत धार्मिक स्थळांना कोट्यावधीचा निधी दिला आहे. जात-धर्म-पक्ष यापलीकडे जावून मानवतावादी दृष्टीकोनातून जनतेचा पालक म्हणून सेवा करीत आहेत. यातून मिळालेले आशीर्वाद व जनतेच्या पाठींब्यातून हसन मुश्रीफ सहाव्यांदा विजयी होतील. यासाठी भगिनींनी अधिक मताधिक्य मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन केले.
यावेळी अमरिन मुश्रीफ, शैलजा भारमल यांनी मनोगते व्यक्त केली.
माजी उपसभापती अंजना सुतार, शबाना शहाणे दिवाण, राजश्री सरदेसाई , सुनिता जाधव, मालुबाई कांबळे, वृद्धांवनी पाटील, मंगल संभाजी पाटील, विजया पाडळे, कविता पाटील, आक्काताई हातकर, सौ. वनिता कुंभार, शोभा चौगले, आल्टीन डिसोजा व्हेरीनिका डिसोजा यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वागत व प्रास्ताविक तालुका संघाचे संचालक प्रकाश पाटील यांनी केले.
– – – – – – – –