भूषण पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
– जिल्ह्यातील मान्यवरांकडून शुभेच्छा
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
माजी जि. प.सदस्य व कागल पंचायत समितीचे उपसभापती भूषण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
वाळवे खुर्द (ता. कागल) येथे विविध संस्था व मान्यवरांनी भूषण पाटील यांना शुभेच्छा दिल्या तर बिद्री येथील दूधसाखर परिवाराच्यावतीने बाबासाहेब पाटील तसेच ‘गोकुळ’ चे संचालक व संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिवसभर मान्यवरांची रिघ लागली होती. जिल्ह्यातील मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, बिद्री कारखान्याचे संचालक मनोज फराकटे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, माजी उपसभापती जयदीप पोवार, राष्ट्रवादीचे विकास पाटील, अण्णा पोवार, दिगंबर पाटील, माजी उपसरपंच भरत पाटील, संभाजी ब्रिगेडचे बाळासो पाटील, निवासराव घाटगे, पोलीस पाटील रमेश ढवण, वसंतराव पाटील, विलासराव पाटील, रमेश पाटील, पांडुरंग पाटील, यशवंत आळवेकर, टी. के. किल्लेदार, सुहास बलुगडे, सचिन पाटील, काशिनाथ पाटील, मॅनेजर पी. बी. कोंडेकर, केशव पाटील यांच्यासह दूधसाखरचे सर्व संचालक, कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यातील बाबाप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
– – – – – – – – –