एकजूटीने प्रयत्न करून महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजय करा : संजयबाबा घाटगे
– बाचणी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत संजयबाबा घाटगे यांचे आवाहन
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
या विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याचा मी निर्णय घेतला. माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याचे समर्थन करून कामाला सुद्धा लागले आहेत. खरोखरच मी घेतलेला सर्वांनी मान्य केला याबाबत सर्वांना धन्यवाद देतो. या निवडणूकीत विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करून महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजय करा. असे आवाहन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
बाचणी (ता. कागल) येथे संजयबाबा घाटगे कार्यकर्त्यांच्या बोलत होते यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
संजयबाबा घाटगे म्हणाले, मी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांच्या हितासाठी घेतला आहे. तुम्ही नेटाने कामाला लागा त्याची परतफेड मुश्रीफ व मी निश्चित करणार असून यापूर्वी ज्यांनी आंम्हाला फसविले त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे.
– – – – – – – – – – –
कार्यकर्त्यांचा सन्मान राखू !
मी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी सन्मानपूर्वक समर्थन करून मनाचा मोठेपणा दाखवला आहे भविष्यात कार्यकर्त्यांचा मान व सन्मान ठेवण्याचा मी व हसन मुश्रीफ करणार आहोत. अशी ग्वाही संजयबाबा घाटगे यांनी केली.
– – – – – – – – – – – –
या बैठकीत उद्योगपती अजित पाटील, अल्लाबक्ष शहाणेदिवाण यांची भाषणे झाली. यावेळी शाहू सेवा संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हातकर, शशिकांत पाटील,, एच. बी. पाटील’, सुजित खामकर, अशोक पाटील, उद्योगपती संदीप पाटील, दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य सुजित खामकर यांनी मानले.
– – – – – – –