महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील विजयी व्हावेत यासाठी नाधवडे येथे श्री जोतिर्लिंगाला साकडे
बिद्री / नाधवडे
टी.एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
विधानसभा निवडणूकीच्यानिमित्त नाधवडे (ता. भुदरगड) येथील महाविकास आघाडीच्यावतीने महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार .के. पी. पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत. यासाठी नाधवडे येथील ग्रामदैवत श्री. ज्योतिर्लिंगाला अभिषेक व साकडे घालण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते एस. के. पाटील, आबासाहेब भोसले, के. डी. पाटील, सरपंच आक्काताई पाटील, ए. आर. .पाटील, .शिवाजी पाटील, बाबुराव एस.पाटील, रघुनाथ पाटील, केशव पाटील, बाळासाहेब पाटील, पांडुरंग पाटील (पिंटू), पांडुरंग गुरव, शिवसैनिक पांडुरंग पाटील (भाई), जयवंत वायदंडे, दिगंबर पाटील, संदीप देसाई, नामदेव देसाई, अमित कामत, बाबुराव पाटील, रवि वायदंडे आदी उपस्थित होते.
— —