अशोक चराटी गटाचा आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा; आजऱ्यात मेळावा
आमदार आबिटकर यांच्या विजयात आजरेकरांचा मोठा वाटा असेल : अशोक चराटी
बिद्री/ आजरा
(व्हिजन मराठी न्यूज)
आजऱ्याची जनता ही विकासाला पाठींबा देणारी आहे. आजरा शहरासह खेडो-पाड्यात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे आबिटकर यांच्या माध्यमातून मार्गस्थ लागली आहेत. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा आमदार विधानसभेत गेला पाहिजे या भुमीकेमुळे मी माझ्या हजारो कार्यकर्त्यांसह आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठींबा जाहीर करत असल्याची घोषणा आण्णा-भाऊ उद्योग समुहाचे प्रमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी केली. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात पाठींबा दर्शविला.
यावेळी बोलताना चराटी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार आबिटकर यांच्याकडे पाहिले जाते. मतदार संघामध्ये चराटी गटाची निर्णायक ताकद असल्यामुळे चराटी गटाला सोबत घेण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, पण आमदार आबिटकर हे नेहमीच सर्वसामान्यांच्यासाठी काम करत असल्यामुळे त्यांच्यासोबत राहणार आहे. असे सांगितले.
— — –
आमदार प्रकाश आबिटकर विजयी होवून मंत्री होतील !
आमदार आबिटकर यांनी आजरा शहरासाठी शंभर कोटींचा निधी दिला आहे. सन- २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये आमच्या गटाने पहिल्यांदा पाठींबा दिला त्याचे लोन संपुर्ण मतदार संघात पसरले तशाचा पध्दतीने यावेळी देखील आमच्या गटाच्या पाठींब्यामुळे आमदार आबिटकर यांचा विजय निश्चित आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येऊन आमदार आबिटकर यांच्या रुपाने या मतदार संघाला मंत्रीपद मिळेल. असा विश्वास श्री चराटी यावेळी व्यक्त केला.
— — — — –
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, नेहमीच अशोकअण्णा चराटी यांची स्पष्टपणाची व सर्वसामान्य लोकांच्या हिताची भूमिका असते. आजरा शहरासह खेडो-पाड्यातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला आहे. अशोकआण्णा चराटी यांच्या पाठींब्यामुळे मला मोठे पाठबळ मिळाले आहे.
यावेळी आजरा बँकेचे संचालक विलास नाईक, स्वागत व प्रास्ताविक करताना जनता शिक्षण संस्था संचालक विजयकुमार पाटील यांच्यासह प्रमुखांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुणकर, भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, गोविंद गुरव जी. एम. पाटील, दशरथ अमृते, राजू पोतनीस, सरपंच धनंजय पाटील, लहू वाकर, डॉ. संदीप देशपांडे, समीर पारदे, पांडुरंग लोंढे, योगेश पाटील यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.
—————