सरवडे येथील प्रा. एम. आर. देसाई शिक्षक पतसंस्थेच्यावतीने सभासदांना भेटवस्तूंचे वाटप
बिद्री / सरवडे
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्यामुळे संस्थेची प्रगती साधली जात आहे. संस्था सभासदांच्या मालकीची असून संचालक मंडळ केवळ विशस्त म्हणून काम पहात आहे. यासाठी मार्गदर्शक नेते, सभासद व संचालक मंडळाचे सहकार्य लाभत आहे. संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून सभासद, ठेवीदार तसेच कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन रामदास तथा आर. एस. नकाते यांनी केले.
सरवडे (ता. राधानगरी) येथील प्राचार्य एम. आर. देसाई शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित राधानगरी, कार्यालय – सरवडे. या संस्थेच्यावतीने सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटप प्रसंगी बोलत होते.
चेअरमन नकाते म्हणाले, भेट वस्तूमध्ये दहा लिटर स्टार सनफ्लावर तेल, बजाज हेअर ऑइल, मोती साबण, उठणे, कापडी पिशवी व थंड पाण्याचा वीस लिटरचा जार आदी वस्तूंचा समावेश आहे. सभासदांनी भेटवस्तू वेळेत घेवून जाव्यात. असे आवाहन केले.
याप्रसंगी शिक्षक नेते नामदेव रेपे, बी. एस. पाटील, प्राचार्य विक्रमसिंह मोरे, मा. प्रा. पी. एस. पाटील, शशिकुमार पाटील, एस. ए. पाटील, एम. पी. शिंदे, आनंदराव सावर्डेकर, मनोज पोवार, संघ तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस दिगंबर टिपुगडे, कोषाध्यक्ष गणेश चव्हाण, पतसंस्थेचे व्हा. चेअरमन शुभांगी डवरी, संचालक राजाराम नारिंगकर, पांडुरंग पाटील, आनंदराव वागवेकर, धनाजी पाटील, पांडुरंग पाटील, रविद्र वागरे, श्रीधर खोराटे, संजय पाटील, वसंत कदम, शामराव चव्हाण, भिमराव रेपे, महादेव कुंभार, नानासाो माने व शुभांगी पाटील (जठार) , कर्मचारी तसेच सभासद उपस्थित होते.
आभार व्हा. चेअरमन शुभांगी डवरी यांनी मानले.
— — –