निवडणूकीत माता-भगिनी माझे रक्षण करतील : मंत्री मुश्रीफ
केंबळी येथे प्रचार सभेत व्यक्त केला मंत्री मुश्रीफ यांनी विश्वास
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
महायुती शासनाने विविध योजना आणून महिला-भगिनींना महिन्याला १५०० रुपये देत आहेत. आतापर्यंत प्रत्येक भगिनींना साडेसात हजार रुपये दिले आहे. पुन्हा महामुतीचे सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयेवरून ३००० रुपये दिले जाणार आहे. कृषीपंपा मोफत वीज, पात्र कुंटूबांना तीन सिलेंडर, तरुणांना १० हजाराचा स्टाइपेंड तसेच प्रवर्गातील मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क सवलत अशा योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. त्यामुळे माता-भगिनी या निवडणूकीत माझे रक्षण करतील असा विश्वास व्यक्त करून एक सेवक, हमाल म्हणून काम करीत राहिन. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
केंबळी (ता. कागल) येथे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क दौऱ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासो पाटील होते. यावेळी ‘बिद्री ‘ चे संचालक मनोज फराकटे, माजी पं. स. सदस्य बाळासो तुरंबे, सरपंच विकास पाटील आदी उपस्थित होते.
ए. एस. पाटील म्हणाले, कागल तालुक्यातील प्रत्येक गावातील गावातील विकास हा मंत्री मुश्रीफ यांच्यामुळेच झाला आहे. यामुळे आंम्ही प्रभावित झालो आहोत.
हनुमान तालमीचे अध्यक्ष प्रदीप पाटील म्हणाले, मंडलिक-मुश्रीफ व संजयबाबा गटाची एकसंध ताकद मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी आहे. कुणी वेगळे करण्याचा प्रयत्न करू नये. एवढेच नव्हे तर मंडलिक- मुश्रीफ गटाची राजकीय डीएनए हा एकच आहे. त्यामुळे मोठे मताधिक्य मिळणार आहे.
ओम गणेश दूध संस्थेचे संजय पाटील म्हणाले, गावातील विकासाचा चेहरा- मोहरा बदलण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले. रस्ते, मंदिर, समाजमंदिर तसेच गोरगरीबाना आधार वाटेल अशी प्रचंड प्रमाणात कामे केली आहेत. त्यामुळे केंबळी गावातून मताधिक्य देवून विजयी करू.
यावेळी सरपंच विकास पाटील, भैय्या पाटील यांची भाषणे झाली.
सभेसाठी आर. के. कुंभार, जे. पी. पाटील, नामदेव पाटील, विठ्ठल पाटील, नाना पाटील यांच्यासह मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
सुत्रसंचालन जालंदर पाटील यांनी तर प्रास्ताविक केतन पाटील यांनी केले. आभार आतीम मुलाणी यांनी मानले.
— — –