लहान मुलांना गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होण्याआधी वेळीच उपचार गरजेचे : डॉ. देसाई
– तपासणीबरोबर हेल्थ कार्डाचे वितरण
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
लहान मुले जेंव्हा आजारी पडतात तेंव्हा वेळीच उपचार करून घेणे गरजेचे आहे. कारण छोटे वाटणारे आजार पुढे गंभीर स्वरूपाचे प्रश्न निर्माण करू शकतात. त्यामुळे वेळीच उपचार करून घ्यायला हवे. असे प्रतिपादन विजया चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉ. शितल देसाई यांनी केले.
कागल तालुक्यातील बाचणी येथे कै. रामचंद्र केशव देसाई यांच्या स्मरणार्थ विजया हॉस्पिटल कागल शाखा बाचणीच्यावतीने लहान मुलांसाठी मोफत तपासणी व हेल्थ कार्डाचे वितरण शिबिर उत्साहात पार पडले. त्याप्रसंगी बोलत होते.
डॉ. देसाई म्हणाले, ज्या लहान मुलांना टायफाईड, निमोनिया, डेंगू झालेला आहे व रोग प्रतिरोधक शक्ती कमी आहे, शौचसाठी वेळ लागतो, वयानुसार वजन कमी किंवा जास्त आहे, सतत बेकरीचे पदार्थ खातात त्यामुळे भुख लागत नाही व वरचेवर आजारी पडतात. अशा सर्व रोगांबाबत उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विशेष वार्षिक सल्ला मसलतसाठी केवळ ८० रुपयांमध्ये हेल्थ कार्डचे सहभागी मुलांना वितरण करण्यात आले. येणार आहे.
— —
वर्षभर होणार उपचार व मार्गदर्शन !
शिबाराचा लाभ सुमारे १०० बालकांनी घेतला. या सर्व सहभागी बालकांना वर्षभरासाठी हेल्थ देण्यात आले आहे. या हेल्थ कार्डद्वारे वर्षभर मोफत उपचार व मार्गदर्शन केले जाणार आहे. यापुढे ही अशी शिबारे आयोजित केली जाणार आहेत. उर्वरित पालकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. देसाई यांनी केले.
— — –
या शिबीरासाठी शाफिन , अवधूत, प्रथमेश, देवेंद्र, आकांक्षा सिस्टर यांचे सहकार्य लाभले. आभार गुरुदत्त मेडिकलचे शुभम पाटील यांनी मानले.
— —