व्हॉलीबॉल संघ निवड समितीच्या अध्यक्षपदी प्रा. अजित पाटील यांची निवड.
बिद्री / कोल्हापूर :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यून)
संघटनेच्यावतीने आंतरराष्ट्रीय आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुले आणि मुली १७ वर्षीय गटांतील भारतीय संघ निवड समिती अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक, बाचणीचे (ता. कागल) सुपुत्र अजित पाटील यांची निवड करण्यात आली. पाटील हे गेली ४० वर्षे बाचणी व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक खेळाडू भारतीय संघातून खेळले आहेत.
अजित पाटील यांनी भारतीय महिला संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि चीन या देशांत झालेल्या आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेत यशस्वी कामगिरी केली आहे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाचणी येथे अद्यावत व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. दिशा ॲकॅडमीच्यावतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत असा प्रयत्न करीत आहेत. आदर्श क्रीडा मंडळाच्यामाध्यमातून अनेक खेळाडू घडवून सैन्य, पोलीस व अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत. व्हॉलीबॉल म्हणजे बाचणी असे नाव प्रा. अजित पाटील यांच्यामुळे जोडले जात आहे.
— –