‘बिद्री ‘ च्या ऐच्छिक ठेवींवरील व्याज अदा
कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांची माहिती
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
बिद्री येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने प्रकल्प स्वभांडवलापोटी सभासद व संस्थांकडून ऐच्छिक ठेवी स्विकारल्या होत्या. त्यावरील व्याज प्रत्येक वर्षी दिवाळीच्या आधी देण्याच्या कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या वचनाप्रमाणे सबंधीत ठेवीदाराच्या खात्यावर व्याजाची रक्कम वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली.
ठेवीवर १० टक्के प्रमाणे व्याज अदा !
कारखान्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत ३१ ऑक्टोंबर २०२४ अखेर जमा असलेल्या ठेवींचे प्रतिवर्षी १० टक्के नुसार होणारी व्याजाची रक्कम ठेवीदारांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. तसेच संस्थांचे व्याज हे त्यांचे नुतनीकरण अथवा रोखीकरणाच्या तारखेदिवशी संस्थांना अदा करण्यात आले आहे.
— — — — — —
कार्यक्षेत्रातील सभासद व संस्थांनी कारखाना व्यवस्थापनावर विश्वास ठेवून आपल्या कष्टाची पुंजी ठेव म्हणून ठेवली आहे. अजूनही ठेवींचा ओघ सूरु असून यापुढेही सभासद व संस्था ठेव ठेवणार असतील तर त्यांनी कारखान्याशी संपर्क करावा. असे आवाहनही कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले आहे. यावेळी विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
*********