बेलवळे खुर्द सरपंचपदी मंडलिक गटाच्या सौ. छाया जाधव तर उपसरपंचपदी राजे गटाच्या सौ. दिपाली पाटील यांची निवड
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होऊन सरपंचपदी मंडलिक गटाच्या सौ. छाया मारुती जाधव व उपसरपंचपदी राजे गटाच्या सौ. दिपाली संजय पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीबाबत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी कोरवी होते.
या ग्रामपंचायतीवर राजे गट, मंडलिक गट व ठाकरे गट ( उबाठा) यांनी वर्चस्व राखले. तर मुश्रीफ गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले.
निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार मान्य वरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवसेना कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, धनाजी कांबळे, अनिता मारुती पाटील उपस्थित होते. तसेच राजे गटाचे गटनेते मारुती आनंदा पाटील, के. पी. पाटील टी. एल. पाटील, जालंदर डोंगळे, श्रीपती पाटील मंडलिक गटाचे विनायक वाईंगडे, हमिदवाडा संचालक नेताजी पाटील, मारुती जाधव, रणजित पाटील गटाचे संभाजी महादेव पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— —