बाचणीच्या प्रगती पाटीलची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
बिद्री/ कराड
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज )
कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमधील विद्यार्थिनी प्रगती पाटील (इयत्ता १२ वी कला) हिने धाराशिव येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीमुळे तिची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. निवडीबद्दल तिचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले तर आई – वडिलांचे यांचे प्रोत्साहन मिळाले.
— —