निधन वार्ता
बिद्री येथील श्रीमती गौराबाई पाटील यांचे निधन
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
बिद्री (ता. कागल) येथील श्रीमती गौराबाई रामचंद्र पाटील यांचे शनिवारी सकाळी (दि. १९ ) वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
जुन्या काळातील श्रीमती गौराबाई यांनी कष्टाने आपला संसार उभा केला. शांत व मितभाषी स्वभावाच्या होत्या. दोन मुले व मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे.
श्री बलभीम विकास सेवा संस्थेचे सचिव अरविंद पाटील यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २१) सकाळी आहे.
— — –