एस.एस.सी बोर्डाच्या सदस्यपदी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांची निवड
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एस.एस.सी व एच.एच.सी बोर्ड) कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद भिमराव पांगिरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार विभागीय शिक्षण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्राचार्य मिलिंद पांगिरेकर हे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे व्हा. चेअरमन असून श्री.आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, ज्ञानप्रबोधिनी, गारगोटी व ज्ञानप्रबोधिनी स्केटिंग क्लबचे अध्यक्ष, बहुजन हिताय प्रतिष्ठानचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
त्यांनी कोल्हापूर जिल्हा दक्षता समितीचे सदस्य, भुदरगड तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर सेवकांची पतसंस्था, गारगोटी या संस्थेचे चेअरमन म्हणून काम केले आहे.
या निवडीसाठी राधानगरी भुदरगड आजऱ्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
— —