गोकुळचा ‘कोजागरी’ निमित्त दूध विक्रीचा नवा उच्चांक
– १८ लाख ६५ हजार लिटर दूध विक्री
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
कोजागरी पौर्णिमेनिमित्त बुधवारी १८ लाख ६५ हजार लिटर गोकुळ दुधाची विक्री झाली. एका दिवसात एवढी दुधाची विक्री होण्याचा हा नवा उच्चांक आहे. याबद्दल गोकुळ कर्मचाऱ्यांच्य वतीने अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्री तसेच दिवाळी सणामध्ये तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा आदी उपपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याचे उद्दिष्ट साध्य करू असा विश्वास श्री डोंगळे यांनी व्यक्त केला.
— — —
विक्रीचा नवा उच्चांक
यावर्षी ८३ हजार ७७४ लिटरने वाढ गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी १७ लाख ८० हजार ९८५ लिटर इतकी दूध विक्री झाली होती. यावर्षी गोकुळच्या विक्रीत ८३ हजार ७७४ लिटरने वाढ झाली.
— — —
यावेळी संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वरिष्ठ अधिकारी डॉ. एम. पी. पाटील, बाजीराव मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
— — —