दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना महायुती सरकारची मोठी भेट
– 570 रुपयांवरून आता 1083 रुपये मानधन
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना महायुती सरकारची मोठी भेट देत
होमगार्ड्सचे मानधन दुप्पट म्हणजेच प्रतिदिन 570 रुपयांवरून आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. राज्यातील सर्व 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे. ही भत्तेवाढ 1 ऑक्टोबर 2024 पासून करण्यात आली आहे. सन-2024-25 या वर्षाकरिता 552.7120 कोटी इतकी अतिरिक्त रक्कम मंजूर करण्यास व त्यानंतर दरवर्षी रुपये 795.7120 कोटी रक्कमेची तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मागील महिन्यातच 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या सर्व कर्मचाऱ्यांवर मोठी भेट दिली आहे.
— — —