वाद्यापूर येथे दसऱ्यानिमित्त महाआरतीचे आयोजन
– सौ. विजयालक्ष्मी प्रकाशराव आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती; नवदुर्गाना पैठणीचे वाटप
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज )
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथे दसरा सणानिमित्त महाआरतीचे आयोजन जोतिर्लिंग मंदिर वाघापूर येथे आमदार प्रकाश आबिटकर प्रेमी वाघापूर यांच्याकडून करण्यात आले होते.
यावेळी भाग्यवान नवदुर्गाना संदीप संभाजी आरडे यांच्याकडून ९ पैठणी भेट देण्यात आल्या. याप्रसंगी सौ. विजयालक्ष्मी प्रकाशराव आबिटकर व मान्यवरांच्या हस्ते पैठणींचे वितरण करण्यात आले. यामध्ये सौ. शोभा रंगराव दाभोळे, सौ. जयश्री नेताजी कुंभार, सौ. शालन शशिकांत दाभोळे, सौ. शोभा संदीप बरकाळे, सौ. छाया अर्जुना तोरसे सौ. उज्वला दीपक जठार, सौ. सुनीता शंकर लोहार, सौ. गीतांजली एकनाथ बरकाळे , सौ. मनिषा पवन जाधव या सर्व नवदुर्गा भाग्यवान ठरल्या.
यावेळी सुनिलराव जठार, संभाजीराव आरडे, बी. एस. जठार, अरविंद जठार, हरीमामा जठार, सागर दाभोळे, देवस्थान समिती सदस्य लालू आरडे, अनिल एकल, सोन्या आरडे, सदाशिव दाभोळे, सचिव मारुती सूर्यवंशी, सौ. छबूताई आरडे, सौ.जयश्री दाभोळे, किसन जठार, दीपक जठार, अरविंद जठार, राजू जठार, समा दाभोळे, सचिन दबडे
सर्व आमदार प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. अर्जुन दाभोळे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.
— — —