कसबा वाळवे ग्रंथालय इमारत बांधकास ना. मुश्रीफ यांनी दिला ५० लाखांचा निधी
-शिष्टमंडळाने केला मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार
बिद्री :
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मार्क्स एंगल्स ग्रंथालय व अभ्यासिका इमारत बांधकामासाठी वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी
५० लाख रुपयांचा निधी दिला. यामुळे ग्रंथालय व वाचन संस्कृती वाढण्यास तसेच सर्वच विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा फायदा होणार मदत आहे.
मार्क्स एंगल्स ग्रंथालयाच्या व्यवस्थापन मंडळाने वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा बँकेचे संचालक भैया माने भेट घेवून वाचनालय इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. मंत्री मुश्रीफ यांनी तात्काळ ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. इमारत बांधकामाची वर्क ऑर्डर ही निघाली आहे.
तात्काळ निधी मंजूर केल्याबद्दल कागल येथे मंत्री मुश्रीफ व भैया माने यांचा शिष्टमंडळाने सत्कार केला. यावेळी मार्क्स एंगल्स ग्रंथालयाचे अध्यक्ष आनंदराव पाटील, रामराव इंगळे, पांडुरंग जाधव, सुधाकर गुरव, अशोक खोत, विकास पाटील, तानाजी खोत, दिलीप पाटील, धनाजी पाडळकर, रियाज शिकलगार आदी उपस्थित होते.
आभार ग्रंथपाल गजानन संकपाळ यांनी मानले.
— — — —
ग्रंथालय चळवळीस चालना मिळेल !
कसबा वाळवे येथील मार्क्स एंगल्स ग्रंथालय जुने ग्रंथालय आहे. वाचकांना दर्जेदार ग्रंथसंपदा निर्माण करून दिली आहे. सुसज्य इमारत झाल्यानंतर वाचकांसाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. मंत्री मुश्रीफ यांचे व भैया माने यांचे आभार मानले. यामुळे ग्रंथालय चळवळीस अधिक चालना मिळू शकेल. असे मत अध्यक्ष आनंदराव पाटील व रामराव इंगळे यांनी व्यक्त केले.
— — — — —