(निधन वार्ता)
बाचणी येथील श्रीमती पार्वती पाटील यांचे निधन
बिद्री : (व्हिजन मराठी न्यूज)
कागल तालुक्यातील बाचणी येथील श्रीमती पार्वती शंकर पाटील यांचे शुक्रवार (दि.११) रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.
अत्यंत खडतर परिश्रमातून त्यांनी आपले कुटुंब सांभाळले. पतीच्या निधनानंतर त्यांनी खंबीरपणे मुलांचा सांभाळ केला. एकत्र कुटुंब पद्धत सांभाळत आदर्श निर्माण केला. गेल्या दिडवर्षापासून त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सामाजिक व राजकीय कार्यकर्ते शिवाजी शंकर पाटील यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित मुली, पुतणे, सूना व नातवंडे असा परिवार आहे.
रविवार (दि. १३) रोजी सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.
— — —