ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे : भरत रसाळे
– अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मागणी
कोल्हापूर
टी. एम. सरदेसाई
(व्हिजन मराठी न्यूज)
महाराष्ट्रातील सर्वांचा लोकप्रिय व उत्साहाचा दिवाळी सण दिनांक २८ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे . त्यामुळे सर्वांची दिवाळी सुखमय होण्यासाठी माहे ऑक्टोबर २०२४ चे वेतन दिवाळीपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबरपर्यंत करावे. व संबंधित विभागांना तसा आदेश जारी करावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली.
याबाबतचे निवेदन शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागातील शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगले यांच्याकडे देण्यात आले. यावेळी उपशिक्षणाधिकारी ठोकळ व लेखाधिकार घनश्याम पुरेकर हे उपस्थित होते.
हे निवेदन वित्तमंत्री ना. पवार यांच्याकडे तात्काळ पाठविणेत येईल. असे शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगले यांनी सांगितले. त्याचबरोबर याबाबतचा मेल ही वित्तमंत्री नामदार पवार यांना तसेच वित्तसचिव यांचेकडे कार्यालयाकडे पाठविणेत आला असल्याची माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली.
— — –