खऱ्या लोक कलावंतांना न्याय मिळावा
– कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघटनेचे अध्यक्ष विलासराव पाटील यांची मागणी
बिद्री : टी. एम. सरदेसाई
( व्हिजन मराठी न्यूज)
राज्य शासनाने कलावंतासाठी चांगले निर्णय घेऊन कलावंतांना एक मोठा आधार दिला आहे. पारंपरिक लोककला संपुष्टात जात असताना शासनाने अभ्यास करून कलेला फार मोठा आधार देऊन कलावंतांना न्याय दिला. परंतु कांही बोगस कलावंतामुळे खऱ्या कलावंतावर अन्याय होत आहे. याची त्वरीत पडताळणी करून खऱ्या कलावंताना न्याय द्यावा. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार संघाचे अध्यक्ष शाहिर विलासराव पाटील यांनी केली.
श्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघ कोल्हापूर ही संस्था १९९३ पासून ते आतापर्यंत लोक कलावंतासाठी काम करीत आहे. त्यांच्या सेवेसाठी मागण्या करत आहे निवेदन देत आंदोलन ना मोर्चे काढून निवेदन देत आहोत. राज्य शासनाने ही लोककलावंतांच्या अनेक मागण्या मंजूर करून कलावंतांना फार मोठा दिलासा दिला आहे.
आमच्या कांही मागण्या पुढीलप्रमाणे :
१) ज्येष्ठा नुसार वृद्ध कलावंतांना मानधन मंजूर करण्यात यावे.
२) कलावंताची चाचणी घेऊन मुलाखत घ्यावी व ओरिजनल फाईल तपासून प्रस्ताव मंजुरीला घ्यावी.
३) वयाचा दाखला ओरिजिनल असण्याची तपासणी करावी.
४) उत्पन्नाचा दाखल्याची सत्यता पडताळावी.
५) कलावंताने केलेल्या कार्यक्रमाचे पुरावे तपासणे गरजेचे आहे
बोगस कलावंत शासनाला फसवविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी. यामुळे बोगस कलावंताना आळा बसू शकेल. या सर्वांमुळे खऱ्या कलावंताला न्याय मिळणार आहे. अशी मागणी लोक कलाकार संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे.
— —- —