मंडलिक कारखान्याचा आज बॉयलर अग्नीप्रदिपन
बिद्री : टी. एम. सरदेसाई ( व्हिजन मराठी न्यूज)
हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन आज (सोमवारी) होत आहे.
दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त सोमवार दि. ७ रोजी सकाळी ११ वा. कारखान्याचे संस्थापक चेअरमन व लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्या वरील पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन ज्येष्ठ साहित्यिक भालबा विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या होणार आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४- २५ चा बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ कारखान्याचे चेअरमन व माजी खासदार संजय मंडलिक व संचालक मंडळ यांच्या हस्ते माजी जिल्हा परिषद सदस्य अरूण इंगवले व यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव शेळके यांची प्रमुख उपस्थिती आहे.
— —