बिद्री येथील दूधसाखर प्रशालेत चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद
बिद्री : व्हिजन मराठी न्यूज (टी.एम.सरदेसाई)
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या आदेशान्वये बिद्री येथील दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयात ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शाही दसरा महोत्सवानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कोल्हापूरचा वारसा संस्कृती व सण परंपरा हा स्पर्धेचा विषय होता. विद्यार्थ्यांनी नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने विविध चित्र रंगवून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रशालेचे प्राचार्य एस. के. खांबे, उपमुख्याध्यापक पी. के. गुरव यांचे प्रोत्साहन लाभले. कला विभाग प्रमुख एस. बी. खोत, डी. टी. कांबळे, एस. एस. सावंत यांनी संयोजन केले. यावेळी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
————————