बाचणी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप पाटील तर उपाध्यक्षपदी सौ.अश्विनी हातकर यांची निवड
बिद्री : सागर सरदेसाई (व्हिजन प्रतिनिधी)
विद्या मंदिर बाचणी (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप आनंदा पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी विकास हातकर यांची निवड करण्यात आली. निवडीबाबत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच सौ. जयश्री उत्तम पाटील होत्या.
तर शालेय शिक्षण समितीच्या सदस्यपदी सौ. किमया विश्वजित सडोलकर, सुरेश कुंडलिक पाटील, संदीप दिलीप पाटील, सौ. स्मिता भरत सुतार, दत्तात्रय विठ्ठल चौगले यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच विशाल पाटील, शालेय व्यवस्थापनच्या माजी अध्यक्षा प्रज्ञा पाटील, माधुरी पाटील, माजी उपसरपंच उत्तम पाटील कागल तालुका संघाचे संचालक प्रकाश पाटील, अन्सार नायकवाडी, रमेश कांबळे, उत्तम चौगले, सागर चौगले, सुभाष पाटील, रणजीत पाटील, संतोष कांबळे, विश्वजीत सडोलकर, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत जयवंत पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुरेश सोनगेकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक कृष्णात बारड यांनी मानले.
— –