मनोज फराकटे यांचा केनवडे येथील शेतकरी मेळाव्यात सत्कार
बिद्री : व्हिजन प्रतिनिधी
बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे युवा नेतृत्व, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज गणपतराव फराकटे यांची निवड झाल्याबद्दल केनवडे येथे अन्नपूर्णा कारखान्यावर पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात सत्कार करण्यात आला.
श्री फराकटे यांचा सत्कार राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्नपूर्णा कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला.