केनवडे येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची वज्रमूठ
– अन्नपूर्णा कारखान्यावर शेतकरी मेळाव्याला उदंड प्रतिसाद
बिद्री : टी. एम. सरदेसाई
निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी ऐतिहासिक वळणावर मला जाहीर पाठींबा व्यक्त केला यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यांचे कार्यकर्तेही माजी आमदार संजयबाबांच्यावर जिवापाड प्रेम करतात. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मला मिळणारच ही मला खात्री आहे. त्यामुळे माझा विजय सुखकर होईल अशी अशा वाटते. मी ही संजयबाबांच्या कार्यकर्त्यांचा मानसन्मान राखून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार असल्याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यावेळी येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांची वज्रमूठ करून जाहिर पाठिंबा व्यक्त केला.
केनवडे (ता. कागल) येथे अन्नपूर्णा करखान्यावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजयबाबा घाटगे होते. यावेळी गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे अरूण इंगवले, दताजीराव घाटगे, राहुल देसाई,विकास पाटील, प्रकाश पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची जिल्हा बॅंकेवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
विकास कामांचे मोजमाप करून सहकार्य करा.
मुश्रीफ पुढे म्हणाले, ही निवडणूक दोन वेगळ्या विचारांची व प्रवृतींच्या विरोधात आहे. एका बाजूला मी 25 वर्षात केलेली प्रचंड विकासकामे तर दुस-या बाजूला मला व माझ्या कुटूंबियांना तुरंगात टाकण्याच प्रयत्न करणारी प्रवृती आहे. विकासाचे कोणतेही काम न करता वडिलांनी काढून दिलेला दूध संघ मोडीत काढण्याचे काम करणारे तालुक्यात लोक आहेत. यामुळे लोकांनी योग्य तो विचार करून अशा प्रवृतीचा बिमोड करण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. माझ्या विकास कामाबद्दल थर्मामीटर किंवा फुटपटी लावून विकास कामांची मोजमाप व तुलना करूनच मला येत्या निवडणूकीत सहकार्य करा. असे आवाहन केले.
संजयबाबा घाटगे म्हणाले, ज्यांचे दार सर्वसामान्यांसाठी सदैव उघडे असते. पहाटेपासून कामाला सुरूवात करून जनसामान्यांना स्वास्थ देण्याचे काम करणारे मंत्री म्हणजे हसन मुश्रीफ होय. इतर नेते स्वतःसाठी जगतात मात्र मंत्री मुश्रीफ हे सर्वसामान्यांसाठी जगणारे नेते आहेत. आता मुश्रीफांच्या रूपाने तोफखाना आपल्याकडे आहे त्यामुळे पुढे कोणीही असूद्या त्यांच्यापुढे कोणाचाही टिकाव लागू शकणार नाही. यासाठी येत्या निवडणूकीत सर्वांनी एकसंधपणे राहून त्यांना उच्चांकी मताधिक्यानी निवडून आणूया. अशा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, यापुर्वी आम्ही विरोधक असलो तरी मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमाद्वारे कारखाना उभारणीत त्यांनी मोठी अर्थिक मदत केली. आमच्या सुमारे १६ हजार सभासदांनी आमच्यावर विश्वास व्यक्त करून शेअर्स खरेदी केले. यामुळेच कारखान्याची उभारणी झाली. बाबा आणि मुश्रीफ हे राजकिय विरोधक असले तरी त्यांच्यात कोणतेच व्यक्तीगत हेवेदावे कधीच आले नाहीत. यापूर्वी निवडणूकीत आमचा पराभव हा कोणी केला ? आहे हे न समजन्या इतपत आमचे कार्यकर्ते अज्ञानी नाहीत. त्यामुळे अशा प्रवृतीच्या विरोधात आम्ही उतरलो असून मंत्री मुश्रीफांना कार्यकर्त्यांच्या पाठबळावर भरघोस मताधिक्यांनी विजयी करू.
यावेळी अजित पाटील, एकनाथ नार्वेकर, बिद्रीचे संचालक राहुल देसाई यांची भाषणे झाली.
मेळाव्यास सौ.अरूंधती घाटगे, भैया माने, सुयशा घाटगे, धनश्रीदेवी घाटगे, मनोज फराकटे, सुनिल सुर्यवंशी, दत्तोपंत वालावलकर, रवि पाटील, नानासो कांबळे, विकास पाटील, संजय पाटील, बाळासो तुरंबे, ए. वाय. पाटील, दत्ता पाटील-केनवडे, विश्वास दिंडोर्ले, काकासो सावडकर, शिवसिंह घाटगे, धनाजी गोधडे, शुभांगी पाटील, स्वाती ढवण, विरेन घाटगे आदी उपस्थित होते.
धनराज घाटगे यांनी स्वागत केले. सुभाष पाटील यांनी सुत्रसंचलन केले. आभार बिद्रीचे संचालक रणजीत मुडूकशिवाले यांनी मानले.
— — — — —
माझ्या विजयाचा घट बसविला..!
मी साहव्यांदा आमदारकीच्या निवडणूकीस सामोरे जात आहे. आज घटस्थापणेचा पवित्र दिवस याचदिवशी संजयबांनी कार्यकर्त्यांचा प्रचंड मेळावा घेवून माझा सन्मान केला. जणू काय त्यांनी येत्या निवडणूकीत माझ्या विजयाचा घट त्यांनी बसविला आहे. असे मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त करताच उपस्थितांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली.
— —