चंद्र- सूर्य असेपर्यंत भारतीय संविधान अबाधित राहील
– पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
बाचणीत संविधान सन्मान परिषदेला जोरदार प्रतिसाद
बिद्री : सागर सरदेसाई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेची फार मोठी देणगी या देशाला दिलेली आहे. चंद्र- सूर्य असेपर्यंत संविधान अबाधित राहील. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
बाचणी (ता. कागल) येथे संविधान सन्मान परिषदेमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी गंगाराम कांबळे यांचे नातू राजेंद्र भास्कर कांबळे होते. त्यांच्याच हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. दरम्यान; मान्यवरांच्या हस्ते लुम्बीनीयन बौद्धविहार व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण झाले.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे सर्वसामान्यांसाठी आहे. राजाला आणि गरीबालाही एकाच मताचा अधिकार संविधानामुळे मिळाला आहे. त्यामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आमदार आणि मंत्री झाला.
त्यांना जमिनी विकत घेऊन देऊ..!
सिद्धनेर्ली ता. कागल येथील दलित समाजाला शंभर वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन समरजीत घाटगे यांनी काढून घेतली आहे. याचा संदर्भ वक्त्यांनी भाषणात घेतला. हा धागा पकडत मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्ली येथील अन्यायग्रस्त दलित समाजाच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूच. प्रसंगी; दुसरी जमीन विकत घेऊन त्यांना जमिनी देऊ.त्यांना जमिनी विकत घेऊन देऊ..!
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, कसलाही आणि कोणताही प्रसंग येऊ दे. कधीही कुणापुढे ही झुकू नका. मी अनेक राजे-रजवाडे बघितले, जे स्वतःच्या पायापुरतच बघतात. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मात्र गोरगरिबांचा कळवळा आणि तळमळ आहे. अलीकडच्या काळात चांगल्या कामात खोडा घालणाऱ्या काही दुष्ट प्रवृत्ती डोकी वर काढत आहेत. अशा प्रवृत्तींना तिथेच ठेचा.
फवारणीने तणाचा नाश करा.. !
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदैव संविधानाची पाठराखणच केली आहे. संविधानाचा सन्मान व्हायचा असेल तर त्यांना पाठबळ द्या. हसन मुश्रीफ नावाचे विकासाचे पीक घ्यावयाचे झाल्यास अचानकपणे उगवलेले तन उपटून काढून टाकावे लागेल. फवारणी करून त्या तणाचा नाश करावा लागेल. उरलेल्या चांगल्या पिकाला लागवड घालायला संजयबाबा घाटगे आहेतच.
— — –
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, बिद्रीचे संचालक उपमहाराष्ट्र केसरी पै. रवींद्र पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, सूर्यकांत पाटील, जगदीश पाटील, दिनकर कोतेकर, बाजार समितीचे संचालक नानासो कांबळे, जयदीप पोवार, अण्णा पोवार, दलितमित्र बळवंतराव माने, संजय हेगडे, सुनील खामकर, सर्जेराव कांबळे, प्रकाश पाटील, एकबाल नायकवडी, विकास पाटील, अल्लाबक्ष शहाणेदिवाण, रमेश कांबळे, सरपंच अर्जना कांबळे, आदी उपस्थित होते.
यावेळी विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक भिकाजी सरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन तेजस्विनी पांचाळ यांनी केले. आभार माजी सरपंच सूर्यकांत पाटील यांनी मानले.
———